गावाविषयी माहिती
प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले लालपाडी व चेहडी खुर्द हि गावे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दक्षिणोत्तर दीड कोस वाहणाऱ्या पवित्र गोदावरी माता नदीच्या काठी वसलेले टुमदार असे छोटेसे प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १९८२ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा २ ,विविध कार्यकारी सोसायटी २ अशी शासकीय व निमशासकीय कार्यालय आहेत.शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सर्व देवी देवतांचे मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोबी, फुलकोबी, ऊस, सोयाबीन, कांदा, शिमला मिर्ची व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. नाशिक जिल्यात भाजीपाला उत्पन्न मध्ये लालपाडी व चेहडी खुर्द गावाचा मोठा वाटा आहे.
लालपाडी व चेहडी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थींना घरकुल लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संपूर्ण गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जल जीवन मिशन व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
लालपाडी व चेहडी हि गावे आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
लालपाडी व चेहडी खुर्द हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २३ कि.मी. अंतरावर व नाशिक शहरापासून २० किमी अंतरावर वसलेले आहे. लालपाडी गावाचे एकूण क्षेत्रफळ २४९.८९ चौ.हे व चेहेडी खुर्द चे एकूण क्षेत्रफळ २७१.३० असे दोन्ही गावे मिळून ५२१.१९ चौ हे क्षेत्र आहे असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ३६६ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १९८२ आहे. त्यामध्ये १०३८ पुरुष व ९४४ महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. गावालगत गोदावरी नदी आहे ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे. उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८° से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ७° से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
लालपाडी -चेहडी खुर्द गाव कोबी, फुलकोबी व भाजीपाला उत्पादनासाठी संपूर्ण नाशिक जिल्यात प्रसिद्ध आहे.
लोकजीवन
लालपाडी -चेहडी खुर्द गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून कोबी, फुलकोबी, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
लालपाडी -चेहडी खुर्द गावाच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
लोकसंख्या
पुरुष
स्त्रिया
एकूण
संस्कृती व परंपरा
लालपाडी -चेहडी खुर्द गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व अखंड हरीनाम साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे लालपाडी -चेहडी खुर्द गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
- ग्रामदैवताचे मंदिर – नागनाथ बाबा महाराज हे गावातील प्रमुख देवतेचे मंदिर आहे हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी यात्रा, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
- गोदावरी नदी – दक्षिणोत्तर दीड कोस वाहणाऱ्या गोदावरी नदीमुळे जलसंधारणाची चांगली सोय होते यामुळे शेती, मासेमारी, पर्यटन विकास यामुळे परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते.
- स्मशान भूमी – लालपाडी चेहडी खुर्द गावातील स्मशान भूमी गोदावरी नदी तीरी आहे त्यामुळे निसर्गरम्य वातावरणामुळे या वैकुंठधाम परिसरास अनोखे आकर्षण आहे.
जवळची गावे
लालपाडी चेहडी खुर्द गाव गोदावरी नदीच्या किनारी वसलेले असून आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे शिंपी टाकळी गावाशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.
चाटोरी, नागापूर, वर्हेदारणा, दारणासांगवी, शिंपी टाकळी ही लालपाडी चेहडी खुर्द आसपासची प्रमुख गावे आहेत.
गटविकास अधिकारी

गटविकास अधिकारी
ग्रामपंचायत प्रशासन

सौ. संगीता गणेश रजपूत
सरपंच
(+91 ) 70668 64122

श्री. सागर सुदाम सानप
उपसरपंच
(+91 ) 73502 80100

श्री. लक्ष्मन विठोबा फडे
सदस्य
(+91 ) 98226 70171

सौ. शोभा सुनील सानप
सदस्य
(+91 ) 83790 20633

श्री. सीताराम तुळशीराम हिलीम
सदस्य
(+91 ) 90675 68695

सौ. वनिता किरण कराटे
सदस्य
(+91 ) 70577 84310

सौ. रंजना यादव रुमणे
सदस्य
(+91 ) 97678 82742

श्री. किरण बाळासाहेब सानप
सदस्य
(+91 ) 99236 31222

सौ. मंगल गोविंद शिंदे
सदस्य
(+91 ) 97651 27447

सौ. सरूबाई तुळशीराम सानप
सदस्य
(+91 ) 95111 28887
समन्वय कर्मचारी
अ.नं. | नाव | विभाग पद | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | श्रीमती.स्मिता सुधाकर गडाख | ग्रामपंचायत अधिकारी लालपाडी | (+91) 94228 54745 |
2. | श्री. शेखर बाजीराव पाटील | ग्राम महसूल अधिकारी चेहडी खुर्द | (+91) 80558 07496 |
3. | श्री. रमेश मनोहर सानप | पोलीस पाटील लालपाडी | (+91) 992109 44404 | 4. | सौ पूनम ज्ञानेश्वर रुमणे | पोलीस पाटील -चेहडी खुर्द | (+91) 95523 43795 |
5. | श्री. सुरेश प्रकाश गांगोडे | सहाय्यक कृषी अधिकारी | (+91) 98813 15433 |
6. | श्री. माणिक गाडे | कोतवाल चेहडी खुर्द | (+91) 98509 69250 |
7. | श्री. शिवाजी हरी बोडके | कोतवाल लालपाडी | (+91) 90756 08171 |
8. | श्री. रविंद्र विठ्ठल बरकडे | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) 98608 44890 |
9. | श्री.सीताराम रामनाथ घुगे | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) 99239 19498 |
10. | श्री.किरण भिमाजी कराटे | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) 78754 31016 |
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले
जन्म नोंद दाखला
मृत्यु नोंद दाखला
विवाह नोंदणी दाखला
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला
निराधार असल्याचा दाखला
नमुना ८ चा उतारा
शिक्षण विभाग
अंगणवाडी विभाग
विद्यार्थी संख्या
अंगणवाडी नाव | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
लालपाडी अंगणवाडी क्र. ५० | 37 | 34 | 71 |
अंगणवाडी क्र. ४८ | 43 | 30 | 73 |
एकूण | 80 | 64 | 144 |
अंगणवाडी सेविका माहिती
नाव | पद नाम | मोबाईल क्रमांक |
---|---|---|
सौ. सरला ज्ञानेश्वर भालेराव | अंगणवाडी सेविका लालपाडी | (+91) 96575 10914 |
सौ. अर्चना संदीप साळवे | अंगणवाडी मदतनीस लालपाडी | (+91) 74988 22305 |
सौ. अर्चना योगेश शिंदे | अंगणवाडी मदतनीस चेहडी खुर्द | (+91) 82084 08636 |
सौ. संगीता नामदेव रजपूत | अंगणवाडी मदतनीस चेहडी खुर्दा | (+91) 95798 51292 |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालपाडी
विद्यार्थी संख्या
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 03 | 05 | 07 |
दुसरी | 03 | 07 | 10 |
तिसरी | 03 | 03 | 06 |
चौथी | 03 | 02 | 05 |
एकूण | 12 | 17 | 29 |
शिक्षक माहिती
नाव | मोबाईल क्रमांक |
---|---|
श्री. कौतिक तुकाराम खुटे | (+91) 98505 15378 |
श्री. सुनील संपतराव शेंडगे | (+91) 98501 34887 |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेहडी खुर्द
विद्यार्थी संख्या
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 03 | 07 | 10 |
दुसरी | 03 | 06 | 09 |
तिसरी | 03 | 05 | 08 |
चौथी | 07 | 02 | 09 |
एकूण | 16 | 17 | 33 |
शिक्षक माहिती
नाव | मोबाईल क्रमांक |
---|---|
श्रीमती. आरती महेंद्रसिंग सूर्यवंशी | (+91) ९७६३८ ५६१२१ |
श्री. संदीपकुमार रामदास साळवे | (+91) ८०८०४ ४७४७९ |
आरोग्य विभाग
अ.नं. | नाव | आरोग्य विभाग पद | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | डॉ. सुजित कोशिरे | तालुका वैद्यकीय अधिकारी | (+91) 94227 57565 |
2. | डॉ. इंजल चव्हाण | पी.एच.सी. वैद्यकीय अधिकारी | (+91) 77588 05330 |
3. | डॉ. प्रियंका साबळे | उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी -चेहडी खुर्द | (+91) 84840 54403 |
4. | श्री. मुरलीधर दत्तात्रय सांगळे | आरोग्य सेवक लालपाडी | (+91) 98698 65611 |
5. | श्री. अक्षय बळवंत पाटील | आरोग्य सेवक लालपाडी | (+91) 96737 56021 |
6. | रेवती महेश काळे | आरोग्य सेविका लालपाडी | (+91) 79723 62855 |
7. | श्रीमती. वनिता सुधीर देशपांडे | आरोग्य सेविका लालपाडी | (+91) 95039 91213 |
8. | श्रीमती. मनीषा विश्वास जोपळे | आरोग्य सेविका लालपाडी | (+91) 99217 36210 |
9. | श्री. हेमंत पुरषोत्तम भोईटे | आरोग्य सेवक चेहडी खुर्द | (+91) 99217 36210 |
10. | सौ. स्वाती भंबारे | आरोग्य सेविका चेहडी खुर्द | (+91) 99217 11768 |
11. | सौ. ज्योती विश्वनाथ सानप | आशा वर्कर लालपाडी | (+91) 76205 87242 |
12. | सौ. मीना गोपीनाथ कराटे | आशा वर्कर चेहडी खुर्द | (+91) 82618 20437 |